रत्नागिरीकला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

कला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

🔴 कला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम

▶️ लांजा – वेरवली खुर्द येथे खास प्रदर्शनाचे आयोजन

आपल्या गावाचा अभिमान, संस्कृतीची ओळख आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वेरवली खुर्द (यादव वाडी) येथे एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘एक दिवस आपल्या मुळांशी जोडणारा…’ या संकल्पनेवर आधारित कला, संस्कृती आणि परंपरेचा एक अनोखा संगम या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणे:

माझी चित्रकला: विविध विषयांवरील सुंदर आणि रेखीव चित्रांचे भव्य प्रदर्शन
(सिद्धेश मनोहर यादव).

गावातील जुन्या वस्तू: आपल्या जुन्या परंपरा आणि आठवणी जपणाऱ्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन (सुभाष यादव).

शिवकालीन मुद्रा आणि संग्रह: इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ नाण्यांचा विशेष संग्रह
(रूपेश सुधाकर पेडणेकर).

कार्यक्रम तपशील:
दिनांक: ८ ते १० ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत
स्थळ: वेरवली खुर्द (वाडी: यादव वाडी)
आयोजक: सुभाष यादव आणि परिवार

“हे फक्त प्रदर्शन नाही, तर हे आपल्या गावाच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि आठवणींचा एक सुंदर प्रवास आहे.”

Breaking News