रत्नागिरीकाल, ०९/०१/२०२६ रोजी डायमंड इंग्रजी स्कूल, अष्टमी येथे वार्षिक स्नेहमेळावा निमित्त भव्य...

काल, ०९/०१/२०२६ रोजी डायमंड इंग्रजी स्कूल, अष्टमी येथे वार्षिक स्नेहमेळावा निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

काल, ०९/०१/२०२६ रोजी डायमंड इंग्रजी स्कूल, अष्टमी येथे वार्षिक स्नेहमेळावा निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास रोहा–अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे, माजी नगराध्यक्ष मा. समीर शेठ शेडगे, नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका तसेच महबूब एजुकेशन ट्रस्टच्या एमडी सौ. सीमा दामाद उपस्थित होते. संस्थेच्या ट्रस्टी मंडळातर्फे सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात काही व्यस्त कारणास्तव माजी आमदार मा. अनिकेतभाई तटकरे व इतर काही मान्यवर उपस्थित राहू शकले नाहीत.

यावेळी नगराध्यक्षा कु. वनश्री शेडगे यांनी इंग्रजी भाषेत केलेले प्रभावी व प्रेरणादायी भाषण उपस्थित विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आवश्यक असून यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. अभ्यास केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने “ऑल-राउंडर” होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. तसेच “रोहा–अष्टमी नगरपालिकेच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी शक्य तेवढे सहकार्य करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

आपल्या शालेय आठवणी सांगताना त्यांनी शाळांशी असलेली आपली जिव्हाळ्याची नाळ व्यक्त केली आणि शाळेला भेट दिल्यावर जुने दिवस पुन्हा आठवतात, असे नमूद केले.

भाषणात त्यांनी खासदार मा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून डायमंड स्कूलच्या कंपाऊंड वॉलसाठी CSR फंडातून २५ लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन पिंपळे यांनी डायमंड स्कूलसाठी ऑडिओ-व्हिज्युअल रूम उभारण्याची घोषणा केली. तसेच एन.ई.एस. नागोठणेचे सचिव श्री. लियाकत कडवेकर व इतर नगरसेवकांनीही शाळेच्या विकासासाठी मोलाचे सहकार्य व पाठबळ दिले.

या सर्व मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे डायमंड स्कूल व्यवस्थापनातर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Breaking News

दैवज्ञ हितवर्धक समाज , आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याला दुहेरी मुकुट

दैवज्ञ हितवर्धक समाज,रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने...