*काळबादेवी जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा युवासेनेतर्फे सत्कार; सिंधुरत्न टॅलेंट सर्च व क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश
*रत्नागिरी : युवासेना व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने काळबादेवी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.*
सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत कुमारी अनन्या अमित मयेकर, कुमारी आरोही सूचित मयेकर, कु. यश दिनेश बिर्जे आणि कुमारी शुभ्रा गणेश भोळे यांनी उल्लेखनीय यश मिळवले. तर क्रीडा स्पर्धांमध्ये कु. अनुज अमोल शेट्ये (लांब उडी – तालुकास्तर), कु. यश दिनेश बिर्जे (बुद्धिबळ – तालुकास्तर), कुमारी अन्वी विनय मयेकर (लांब उडी – केंद्रस्तर) आणि कुमारी पूर्वी ऋषिकेश शेट्ये (धावणे – केंद्रस्तर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड तसेच सहाय्यक शिक्षक महेश आरेकर, वैशाली झोरे आणि अमृता काजवे यांची मेहनत मोलाची ठरली आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, शाळेला खेळाचे मैदान नसतानाही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. शाळेला खेळाचे मैदान मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या सत्कार सोहळ्यास ज्येष्ठ शिवसैनिक बंडयाशेठ पेटकर, शाळा कार्यकारिणी मंडळाच्या उपाध्यक्षा सावली सूचित मयेकर, अंगणवाडी सेविका राखी भोळे, युवासेना समन्वयक साई गावडे, काळबादेवी शाखाप्रमुख ओंकार सत्यजित (सत्या) वायंगणकर, उपशाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, युवासेना स्थानिक प्रतिनिधी रणजितसिंग मालगुंडकर तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भुवड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
