केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त विमान तळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याच स्वागतप्रसंगी अनिकेत पटवर्धन यांना अमित शहा यांची सदिच्छा भेट घेण्याची संधी मिळाली. ही महत्त्वाची संधी त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे मिळाली भेटीदरम्यान अमित शहा यांनी कोकणातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींबाबत विशेष आस्थेने विचारपूस केली. कोकणातील विकास, स्थानिक समस्या आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरही सौहार्दपूर्ण चर्चा झाली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त विमान तळावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
