रत्नागिरीकोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने सुधाकर कदम व दिपक मोरे यांना ‘सुवर्ण...

कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने सुधाकर कदम व दिपक मोरे यांना ‘सुवर्ण होन’ भेट

कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने सुधाकर कदम व दिपक मोरे यांना ‘सुवर्ण होन’ भेट.

महाड : श्री क्षेत्र टेरव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी गावचे सुपुत्र तथा सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक श्री. सुधाकर कदम तसेच कळसांबडे, ता. तळा गावचे सुपुत्र श्री. दिपक मोरे यांनी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून कोकण कडा मित्र मंडळ, रायगड यांची सदिच्छा भेट घेतली.

या सदिच्छा भेटीप्रसंगी कोकण कडा मित्र मंडळ, रायगडचे अध्यक्ष श्री. रोहित सुरेश पवार यांच्या शुभहस्ते व मंडळाचे चिटणीस श्री महेश मोरे यांच्या उपस्थितीत श्री. सुधाकर कदम व श्री. दीपक मोरे यांना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रतीक असलेले ‘सुवर्ण होन’ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारी ही सुवर्णमय भेट उपस्थितांसाठी विशेष भावनिक व अविस्मरणीय ठरली. या स्नेहपूर्ण सन्मानाबद्दल श्री. सुधाकर कदम व श्री. दिपक मोरे यांनी कोकण कडा मित्र मंडळ, रायगडचे अध्यक्ष श्री. रोहित सुरेश पवार, चिटणीस श्री महेश मोरे तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा जागर समाजामध्ये सातत्याने होत राहावा, या भावनेतून झालेली ही भेट विशेष उल्लेखनीय ठरली.

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...