👉 सऊदी अरबिया येथील पवित्र मक्का शहरात नोकरी करून वेळात वेळ काढून कौम साठी सामाजिक काम करणाऱ्या कोकण कमेटी मक्का चे प्रमुख पदाधिकारी सय्यद अहमद काद्री.रफीक पावसकर. असद खान. राशीद कापडे. सुलतान पावसकर मोहसीन खान.नुरमहमद खान.अल्तमश फोंडु. अजहर मालदार.शोहेब पटेल.आमीर खान. सईद कापडी.सर्फराज काझी. अब्बास सय्यद आदींचे आरोग्य.शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य व काम खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणादायी असल्याचे मत कोकण 24 तास न्यूज चॅनल चे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमियां काझी यांनी व्यक्त केले व कोकण कमेटी मक्का ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरी येथील कोकणी बांधवांनी नोकरी करुन सउदीअरब येथील मक्का शहरात कोकण कमेटी मक्का ची स्थापना केली आणि या कमेटी मार्फत मक्का मदिना येथे हज आणि उमरा साठी जाणाऱ्या सर्वच मुस्लिम बांधवांना आणि खास करून कोकणी लोकांना अडीअडचणीच्या वेळी सहकार्य करू लागले. कोणी आजारी पडला तर धावुन जाऊन मदद करणे. काही अडचण आली असेल तर सहकार्य करणे अशी कामे करू लागले. त्यामुळे कोकण कमेटी मक्का ही अल्पावधीतच परदेशात काम करणारी एक लोकप्रिय कमेटी ठरली आहे..
कोकण कमेटी मक्का मागील चार वर्षांपासून कॅलेंडर तयार करीत आहे आणि त्याचे प्रकाशन रत्नागिरी येथील सावंत पॅलेस हॉटेल येथे मान्यवरांच्या हस्ते केले जात आहे ही बाब खरोखरच अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे आयोजित कॅलेंडर प्रकाशनाच्या कार्यक्रमाला कोकण 24 तास न्यूज चॅनल चे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अलिमियां काझी. हॉटेल सावंत पॅलेस चे मुख्य संचालक शकील सावंत. राष्ट्रवादीचे नेते बशीर मृर्तूझा.नगरसेवक सुहेल मुकादम.शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक.उधोजक मुदद्सर मुकादम.अजीज नाकाडे. नौशीन काझी.ईम्तीयाज पटेल.ईलु खोपेकर.वसीम शेख.मौलाना जुबेर नाकडे. हाफीज बाशीत दर्वे कारी मुजतीबा ईब्जी आदी मान्यवर मोठ्या उपस्थित होते.शकील सावंत.बशीर मुर्तुझा आणि कारी मुजतीबा ईब्जी ईलु खोपेकर यांनी ही आपले शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले आणि कोकण कमेटी मक्का च्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या..
कारी मुजतीबा ईब्जी यांच्या तिलावते कुरान ने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर त्यांच्याच दुआ ने कार्यक्रमाची सांगता झाली. ईम्तीयाज सिद्दीकी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले..कॅलेंडर तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्या सर्व देणगीदार आणि जाहिरातदारांचा मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
