रत्नागिरीकोकणातील दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड

कोकणातील दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड

कोकणातील दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड …..
तर महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली समरीन बुरोंडकर हिच्या कडे

दिनांक. 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीत
श्री. नरेंद्रदास मोदी स्टेडियम सटना मध्यप्रदेश येथे होणाऱ्या 5 व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे संघातील खेळाडु
कु. समरीन शौकत बुरोंडकर व
कु. तस्नीम समद बुरोंडकर या दोन भगिनींची पुन्हा महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी समरीन बुरोंडकर हिची पुन्हा निवड करण्यात आली आहे.
डोंबिवली पुर्व ठाणे येथे 11 मार्च 2026 पासुन महाराष्ट्र महिला पुरुष संघांचा सराव शिबीर चालु होता या सराव शिबिरामधून अंतिम 14 खेळाडूंची निवड करण्यात आली.
दोन्ही भगिनीने सराव शिबिरात चढाई व पकडी चे उत्तम प्रकारे चमकदार व दमदार प्रदर्शन करुन स्वतःचा आत्मविश्वास व चिकाटी या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीचे लक्ष वेधले व आपली निवड कायम करण्यास यशस्वी झाल्या.
निवड समितीने दोन्ही भगिनींच्या खेळाच्या गुणवत्तेनुसार कु. समरीन हिची उजवा मध्य रक्षक + चढाईपटु तर कु. तस्नीम हिची उजवा कोपरा रक्षक म्हणुन निवड
करण्यात आली.
त्यांच्या या निवडी बद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व खेड तालुका कबड्डी असोसिएशन वतीने अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…

Breaking News

मुंबई मध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक विकास विषयांवर सकारात्मक चर्चा

मुंबई मध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक विकास विषयांवर सकारात्मक चर्चा- 👉भारतीय...

चिपळूण जिल्हा न्यायालय; राष्ट्रीय लोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रलंबित प्रकरणात ३ कोटी ८५ लाखाहून अधिक रक्कम वसूलरत्नागिरी,...