रत्नागिरीकोल्हेवाडीत महायुतीचा झंझावात!

कोल्हेवाडीत महायुतीचा झंझावात!

आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांना मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद- 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात महायुतीचा प्रचार दौरा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. आमदार श्री. किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या दौऱ्यात ग्रामस्थांनी उमेदवारांचे जंगी स्वागत केले ज्यामुळे परिसरात महायुतीच्या विजयाचा निर्धार स्पष्टपणे दिसून आला.

या प्रचार दौऱ्यात जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. विनीता विनय गांगण आणि प्रभवल्ली पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री.उमेश दादा पत्की यांच्यासाठी दिग्गजांनी मैदानात उतरून मतदारांशी संवाद साधला.

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व निरीक्षक जगदीशजी राजापकर, विधानसभा समन्वयक श्रीकांत कांबळे, आणि माजी उपसभापती दिलीप पळसुळेदेसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नेत्यांनी यावेळी महायुतीने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचत, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विनीता गांगण आणि उमेश पत्की यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कोल्हेवाडीच्या सरपच सौ.वैदही बेंद्रे, उपसरपंच आणि माजी सरपंच शशिकां कदम या दौऱ्यात महिला शक्तीचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला.महिला तालुका संघटक सौ.प्रियंका रसाळ महिला विभागीय सौ. सानिया गांधी आणि मानसी बेर्डे यांनी महिलांच्या समस्या आणि विकास यावर भर दिला.

विभाग प्रमुख श्री.दिलीप आग्रे,विभाग प्रमुख श्री.प्रमोद गुरव,युवा नेतृत्व श्री.विनय गांगण, युवा नेतृत्व श्री.तेजस कदम, जितू ब्रीद, मयूर कांबळे,श्री.अभिजित सावंत
श्री.सुरेश शिंगम,श्री.राजेंद्र गांधी शाखाप्रमुख श्री.विजय बेंद्रे,गावकर श्री.राजेश जोईल, श्री.मोरे बुवा.इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान बोलताना उमेदवारांनी कोल्हेवाडीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले. गावातील तरुणाईचा आणि जेष्ठ मंडळींचा मिळणारा प्रतिसाद पाहता, कोल्हेवाडीतून महायुतीला मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Breaking News