*गाव म्हणजे केवळ नाव नाही…
गाव म्हणजे मातीचा वास, आठवणींचा ओलावा आणि माणसांच्या नात्यांची ऊब.
*ज्या माणसांनी आयुष्यभर* काही मागितलं नाही,
पण गावासाठी सर्वस्व दिलं… तीच माणसं म्हणजे गावातील खर्या अर्थाने ग्रामरत्नं. हीच ग्रामरत्नं ओळखून, त्यांच्या सेवेला शब्दांत वंदन करण्यासाठी
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मा. ना. डॉ. उदयजी सामंत साहेब आणि लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किरणजी सामंत साहेब
यांच्या वाढदिवसाच्या पावन प्रसंगी खानू गावातील ग्रामरत्नांचा सन्मान सोहळा मनाला चिरंतन स्पर्श करणाऱ्या वातावरणात पार पडला.या सोहळ्यात जेव्हा
आईच्या मायेने लेकरांना जन्म देणाऱ्या सुईण बाईंचे हात थरथरत पुढे आले, निःस्वार्थपणे जीव वाचवणाऱ्या गावच्या वैद्यांचे अनुभव शब्दांत मावत नव्हते, देशासाठी छाती पुढे करून उभे राहिलेले माजी सैनिक डोळ्यांत अभिमान आणि अश्रू घेऊन उभे होते, तर आयुष्यभर संघर्ष सोसूनही न झुकलेल्या कणखर महिलांचे मौनच खूप काही सांगून गेले.
भजनाच्या तालात देवाजवळ पोहोचलेली जुनी भजनी मंडळी,पिढ्यान्पिढ्या आयुष्य घडवणारे आदर्श शिक्षक,
मन मोठं ठेवून सतत देत राहिलेले दानशूर हात, प्रत्येक वेळी धावून येणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविका,
गावाचा कणा असलेले मदतनीस, सी.आर.पी., ग्रामपंचायत कर्मचारी,पावसात, उन्हात वार्ता पोहोचवणारे पोस्टमन, रात्री-अपरात्री गाव राखणारे कोतवाल,मृत्यूच्या छायेतून जीव वाचवणारे सर्पमित्र, परंपरा जपणाऱ्या बैलगाडी शर्यतीतील मालक, आणि गावासाठी काहीही न सांगता देणाऱ्या प्रत्येक निःस्वार्थ व्यक्तीचा तो केवळ सन्मान नव्हता…
तो त्यांच्या आयुष्याच्या त्यागाला दिलेला मानाचा मुजरा होता.
त्या क्षणी जुन्या आठवणी अश्रूंमधून वाहू लागल्या,
ज्येष्ठांच्या डोळ्यांत समाधान चमकलं,आणि तरुण पिढीच्या मनात “आपण कुठून आलो आहोत” याची खोल जाणीव रुजली.
हा सारा भावनांचा संगम श्री. परशुराम कदम यांच्या संवेदनशील मनातून जन्माला आला.
जाणत्या माणसांच्या चरणी नतमस्तक होत
त्यांनी त्यांच्या कार्याला मनापासून सलाम केला.
कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी, मानकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,प्राथमिक आरोग्य केंद्र खानू वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद आणि प्रत्येक गावकऱ्याने दिलेल्या प्रेम, सहकार्य आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत,
हा सोहळा फक्त एक कार्यक्रम न राहता — आयुष्यभर मनात राहणारी आठवण बनून गेला.
