रत्नागिरीखेड मधील रोटरी स्कूलच्या कु. हेरंब लोंढे याची आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन मोहिमेत...

खेड मधील रोटरी स्कूलच्या कु. हेरंब लोंढे याची आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी

खेड मधील रोटरी स्कूलच्या कु. हेरंब लोंढे याची आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी.
खेड :- तालुक्यातील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील इ. 7 वी मध्ये शिकणारा कु. हेरंब लोंढे याने एस्रोमॅजिका यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुग्रह शोध मोहीम कार्यक्रमात रोटरी याने उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
सदरच्या मोहिमेदरम्यान दुर्बिणीद्वारे प्राप्त झालेल्या खगोलशास्त्रीय छायाचित्रांचे सूक्ष्म विश्लेषण करताना कु. हेरंब लोंढे याने आकाशात हालचाल करणारी एक नवीन खगोलीय वस्तू (ॲस्टेरॉइड) ओळखली. या वस्तूला P12kFHS असा तात्पुरता ओळख क्रमांक दिला. या निरीक्षणाची माहिती पुढील वैज्ञानिक पडताळणीसाठी लघुग्रह केंद्राकडे ( मायनर प्लानेट सेंटर ) पाठविण्यात आली आहे. हे केंद्र ’आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ’ अंतर्गत कार्यरत असून जगभरातील लघुग्रह व धूमकेतूंच्या शोधांची अधिकृत नोंद ठेवते. प्राथमिक तपासणीनंतर या वस्तूची ’प्राथमिक लघुग्रह शोध’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात कु. हेरंब लोंढे याने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल अत्यंत अभिमानास्पद व शाळेच्या नावलौकिकात मानाचा ठसा उमटवणारे ठरले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला रोटरी स्कूलतर्फे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कु. हेरंबला सर्व विज्ञान व समाजशास्त्र विषय शिक्षक व त्याच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी कु. हेरंबचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News