खेडखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा यशस्वी; पक्षवाढी साठी ठोस रणनीतीवर भर

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा यशस्वी; पक्षवाढी साठी ठोस रणनीतीवर भर

खेड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा खेड येथे प्रदेशाध्यक्ष खासदार श्री.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यामध्ये पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.या बैठकीत पक्षवाढ, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती, आणि नवीन कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. यावेळी प्रांतिक उपाध्यक्ष शौकत मुकादम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव,सरचिटणीस जयेंद्र खताते, सौ.साधनाताई बोत्रे,संदीप राजपुरे, अजय बिरवटकर,संतू कदम,संजय जाधव, जयवंत जालगावकर, शरद शिगवण, पांडुरंग पाष्टे,अनंत निकम, अवधूत म्हसकर, ईशान म्हापदी,महमद कारभारी, रजनीकांत धोत्रे,अजित जाधव, फराज नाडकर,काशिफ नाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्यात असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यामुळे संघटनेला नवसंजीवनी मिळाली.नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या:प्रकाश शिगवण –जिल्हा उपाध्यक्ष, सौ.संजना बुरटे –खेड महिला कार्याध्यक्ष, अनिल सदरे –खेड शहराध्यक्ष, रजनीकांत धोत्रे –खेड शहराध्यक्ष,रत्नागिरी अल्पसंख्याक सेल खालिद पटाईत या बैठकीत शौकत मुकादम यांनी आपले परखड विचार मांडत संघटनेच्या भक्कम उभारणीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.अन्य पदाधिकाऱ्यांनीही पक्षकार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...