चिपळूण:गेली दोन वर्षे बहादूरशेख परिसरातील पुलाजवळ गणपती विसर्जन करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.यामुळे यावर्षीही गणेशभक्तांची मोठी गैरसोय होणार आहे.या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे माजी सभापती शौकत मुकादम यांनी लक्ष वेधले आहे.प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली नाही,तर आम्ही आंदोलन छेडू,असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.गणेशोत्सवात याठिकाणी काविळतळी,ओझरवाडी,मतेवाडी,माळेवाडी,गांधीनगर,कळंबस्ते, येथील आजुबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक गणेश विसर्जनासाठी येत असतात.या भागात विसर्जनासाठी योग्य ठिकाण निश्चित करून विसर्जन घाट बांधण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.तर आम्ही सर्व पक्षीय आंदोलन छेडू,असा स्पष्ट इशाराही श्री.मुकादम यांनी दिला आहे.त्याबाबतचा लेखी पत्रव्यवहार त्यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग विभाग,पोलीस प्रशासन यांना पाठवला आहे.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.