रत्नागिरीगणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत अवस्थेत डॉल्फिन….

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत अवस्थेत डॉल्फिन….

रत्नागिरी तालुक्यातील निसर्गरम्य गणपतीपुळे येथील शांत समुद्रकिनाऱ्यावर काल बुधवारी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना वाळूमध्ये एक मृत डॉल्फिन (देवमासा) पडलेला दिसला
दुपारी किनाऱ्यावरील शांत वातावरणात हा डॉल्फिन मृत अवस्थेत पडलेला पाहून अनेकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. हा डॉल्फिन साधारण ४ फूट लांबीचा आहे. मृत डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वन विभागाला कळवण्यात आली आहे. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
समुद्रातील प्रदूषण, जहाजांची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Breaking News

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस15 जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस धावणार….

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या...