गतिमान प्रशासनाला बळ ! राज्यअतिथी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासाठीच्या वाहनांचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले वितरण–
👉रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे आणि राजशिष्टाचाराअंतर्गत येणाऱ्या राज्यअतिथींचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला नवीन वाहनांची भेट मिळाली आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या दि. 27 जून 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार “गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या योजनेंतर्गत जिल्हा नियोजन विभागाच्या वार्षिक आराखड्यातून जिल्हाधिकारी कार्यालयासाठी रु. 97,81,379 इतका निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून एकूण 5 वाहने विकत घेण्यात आली होती, त्याचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले:
राजशिष्टाचाराअंतर्गत जिल्ह्यात येणाऱ्या राज्यअतिथींसाठी – 1 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयीन वापरासाठी – 1 टोयोटा इनोव्हा क्रिस्टा
उपविभागीय अधिकारी, चिपळूण – 1 महिंद्रा XUV 7XO
उपविभागीय अधिकारी, दापोली – 1 महिंद्रा XUV 7XO
तहसीलदार, चिपळूण – 1 महिंद्रा स्कॉर्पिओ
या नवीन वाहनांमुळे क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज, दौरे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देणे अधिक सोपे होणार असून, जनतेपर्यंत प्रशासकीय सेवा जलदगतीने पोहोचण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केले
