गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक युवा कौशल्य सप्ताहाची सुरुवात करण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास 500 पेक्षाअधिक विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फिनोलेक्स कंपनी फॅक्टरी मॅनेजर श्री सागर चिवटे, रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक unbox the desire brand चे सर्वेसर्वा श्री गौरांग आगाशे, प्रसिद्ध उद्योजक श्री सुफियान नाखवा, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री आनंद देसाई व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. शशिकांत कोतवडेकर तसेच गटनिदेशक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कौशल्य विकास च्या प्रमुख ईनुजा शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक युवा कौशल्य सप्ताहाची सुरुवात करण्यात आली असून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
