रत्नागिरीग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’...

ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन

ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन–
रत्नागिरी, (जिमाका) : संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष आरोग्य जनजागृती कार्यक्रम आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या शिबिरादरम्यान नागरिकांना आणि रुग्णांना बदलती जीवनशैली, नियमित व्यायामाचे महत्त्व, संतुलित व पौष्टिक आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘स्टेमी’ (STEMI) उपक्रमाबाबत माहिती देऊन वेळेत उपचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित या शिबिरात उपस्थितांची एक्स-रे (X-Ray), हिमोग्लोबिन, रक्तदाब (BP), मधुमेह (शुगर) आणि ईसीजी (ECG) यांसारख्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरास परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असंसर्गजन्य रोग (NCD) विभागाचे समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि ग्रामीण रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वेळेवर निदान आणि निरोगी जीवनशैली हेच निरोगी हृदयाचे गमक असल्याचे यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले.

Breaking News

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा; स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या! दि....

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...