रत्नागिरीजवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी
सावर्डे : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांची जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी निवड झाली आहे.
या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीतील एकूण 11 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत या विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत ही शाळा चालवली जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा दिली जाते.
या यशासाठी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख साजिद चिकटे तसेच प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के व सौ. श्रुती जाधव यांनी मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Breaking News

एम. एन. जोशी स्कूलमध्ये अटलबिहारी वाजपेयी स्मृती सभागृहाचे नामकरण

रत्नागिरी : भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून...