रत्नागिरीजाकादेवी, रत्नागिरी येथे कोंकण नमन कलामंच

जाकादेवी, रत्नागिरी येथे कोंकण नमन कलामंच

रत्नागिरी: बहुआयामी महानमन कार्यक्रमास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान नमन कलाकारांनी तयार केलेल्या गाण्यांची आठवण सांगितली. विशेष म्हणजे, विजयश्री मिळवून देणारी दोन्ही गाणी रत्नागिरीच्या नमन कलाकारांनी सादर केली होती. नमन कला सातासमुद्रापलीकडे पोहोचेल, याची खात्री असल्याचं यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

नमन कला पुढे नेण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्रातील विविध लोककला जतन करण्यासाठी तसेच नमन कला जोपासण्यासाठी राजाश्रय देण्यात खारीचा वाटा असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं

या प्रसंगी कोंकण नमन कलामंचचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, हरिश्चंद्र बंडबे, शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवासेना कोकण विस्तारक परशुराम कदम यांच्यासह नमन प्रेमी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News