रत्नागिरीजातीपातीचे राजकारण न करता शब्दाला जागणारा जनप्रतिनिधी असल्याने , देवरुख मुस्लिम समाजा...

जातीपातीचे राजकारण न करता शब्दाला जागणारा जनप्रतिनिधी असल्याने , देवरुख मुस्लिम समाजा सदैव निकमसरांच्या पाठी ठाम हनिफ हरचिरकर

देवरूख मुस्लिम बांधवांतर्फे आ. निकम यांचा सत्कार

देवरूख सुरेश सप्रे जातीपातीचे राजकारण न करता शब्दाला जागुन दिलेला शब्द पाळणारा आमदार आहे. म्हणून आम्ही शेखर निकम यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे आहोत.”असे प्रतिपादन हनिफ हरचिरकर यांनी केले.

देवरुख शहरातील मुस्लिम समाजासाठी सामाजिक सभागृह (हॉल) आणि इतर विकास कामांसाठी आमदार शेखर निकम यांनी निधी मंजूर केला. व कामे सुरू झाली. या बद्दल देवरूख मुस्लिम समाजाने सावर्डे येथील आमदारांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार करत मनःपूर्वक आभार मानले. त्यावेळी हरचिरकर बोलत होते.

समाजाचे स्वतःचं सभागृह उभारल्यास मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ, महिलांचे उपक्रम तसेच सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यासाठी एक स्वतंत्र आणि सुसज्ज हॉल आवश्यक होता. ही बाब मुस्लिम समाजाने निदर्शनास आणून या मागणीसह विविध अडचणी आमदारांसमोर मांडल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी होती ती सभागृहाची या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शेखर निकम यांनी 2025 निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पाळला. जागेविषयी असलेली अडचण दूर करत, कोणताही जात-पंथ न पाहता, केवळ सामाजिक विकासाच्या दृष्टीने निधी मंजूर केला.व कामाला प्रारंभ झाला असल्याने मुस्लिम समाजाच्या वतीनेआम. निकम यांची सावर्डे येथे भेट घेवून त्यांचा सत्कार करण्यात आला .

राजकारणाच्या पलिकडे जाऊन, समाजाच्या गरजा ओळखून काम करणं हेच खऱ्या जनतेच्या आमदाराचं कर्तव्य असतं,” ते मी पार पाडत आहे असे आमदार शेखर निकम यांनी बोलताना सांगितले.

या भेटीत मुस्लिम समाजाचे
रजाकभाई बोदले, हानिफभाई हरचिरकर, महमदभाई बोदले, नझीर भाई, मुबीन साटविलकर, हुसेन भाई, समीर भाई, अलताफ भाई, बाबामिया, अनवर भाई शिरगांवकर, हिदाम शेख, अयुब साठविलकर, मुराद बोदले आदी समाज बांधव उपस्थित होते.

Breaking News