रत्नागिरीजिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, खंडाळा केंद्राचा "मोफत शिवणकाम प्रशिक्षण" उद्घाटन सोहळा,...

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, खंडाळा केंद्राचा “मोफत शिवणकाम प्रशिक्षण” उद्घाटन सोहळा, खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू समारंभास २०० महिलांची उपस्थिती

◾ वाटद, खंडाळा येथे, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, खंडाळा केंद्राचा “मोफत शिवणकाम प्रशिक्षण” उद्घाटन सोहळा, खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.

◾ क्रांतीवीर सावित्री बाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ह्या सोहळ्यास वाटद पंचक्रोशीतील २०० महिलांनी उपस्थित राहून, विविध खेळात भाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

◾पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. आराध्या पवार आणि सौ. तन्वी ताम्हणकर तसेच इतर खेळात उत्कृष्ट खेळलेल्या २० महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

◾ जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट श्री महेंद्रजी मांडवकर साहेब आणि तालुकाध्यक्ष श्री मंदार जी नैकर साहेब, त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, उपस्थित महिलां समवेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

◾ जिजाऊ संस्था, महाराष्ट्र सचिव श्री केदारजी चव्हाण साहेब, जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट श्री महेंद्रजी मांडवकर साहेब, तालुकाध्यक्ष श्री मंदार जी नैकर साहेब, सौ. प्रणाली गावडे मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थितीत “मोफत शिवणकाम प्रशिक्षणाचे” उद्घाटन करण्यात आले.

◾खंडाळा केंद्र प्रमुख श्री दीपक सांबरे सर यांच्या सोबत खंडाळा येथील कार्यकर्ते श्री केशव बलेकर सर, श्री नितीन वीर सर, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमूल्य योगदान दिले.

◾महिला कार्यकर्त्या वर्षा राजे निंबाळकर, सौ निधी वीर, सौ दिक्षा जंगम, सौ, मंजुषा झगडे, श्रुती जंगम यांनी हळदी कुंक समरंभाच्या नियोजना पासून ते सांगते पर्यंत कार्यक्रमाची धुरा सांभाळली.

◾कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री मंदार शिंदे यांनी केले, तर छाया चित्रण सौ, प्राजक्ता जंगम यांनी केले.

◾जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री निलेश जी भगवान सांबरे साहेब यांचे समाज सेवेचे हे व्रत वाटद विभागातील गरजुंकडे या कार्यक्रमाच्या मध्यामाने पोहचेल, असा विश्वास रत्नसिंधू न्यूज मिडिया च्या संस्थापिका / संपादिका वर्षा राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

Breaking News

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...

खेड मधील एल.टी.टी. स्कुलची रत्नागिरी जिल्हास्तरीय कब-बुलबुल जिल्हा मेळाव्यात उत्तुंग कामगिरी

खेड येथील एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूलच्यास्काऊटच्या विद्यार्थ्यांनी...