रत्नागिरीजिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई फेरफार वापरकर्ते यांना...

जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई फेरफार वापरकर्ते यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले

जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई फेरफार वापरकर्ते यांना लॅपटॉप व प्रिंटरचे वितरण आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले-.

याप्रसंगी ना. उदयजी सामंत ह्यांनी संवाद साधतांना, दिव्यांगांना मान सन्मान देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा रत्नागिरी ठरावा, अशा पध्दतीने प्रशासनाने काम करावे. माझ्या जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना, भगिनींना काही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जि. प. सदस्य बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

Breaking News