👉 रत्नागिरी चे जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे तिसऱ्या मजल्यावर बसवून शासकीय कामकाज पाहतात. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक विविध कामांसाठी त्यांना नेहमीच भेटायला येतात आणि ते थेट तिसऱ्या मजल्यावर जातात. परंतु अंपग आणि दिव्यांग मात्र तिसऱ्या मजल्यावर जावू शकत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालया च्या प्रांगणात आलेल्या त्या सर्व दिव्यांगांना जिल्हाधिकारी श्री मनुज जिंदल खाली पोर्च मध्ये येऊन भेटलेल्यांने दिव्यांग भारावून गेले.फक्त भेटले नाहीत तर त्यांच्या सोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या मार्गी लावण्यासाठी जरूर प्रयत्न करू असे सांगितले.. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिव्यांग बांधवां बाबत दाखविलेल्या भावना आणि माणुसकी मुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे
