रत्नागिरीजिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेतही कसबा हायस्कूलने आपला दबदबा निर्माण करत संघाने ठेवले अजिंक्यपद...

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेतही कसबा हायस्कूलने आपला दबदबा निर्माण करत संघाने ठेवले अजिंक्यपद कायम

विभागस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

▪️महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.९/१०/२०२५ रोजी एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल डेरवण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी याठिकाणी १९ वर्ष वयोगट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

▪️सदर स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयातील १९ वर्ष वयोगट विद्यार्थ्यांच्या संघाने संगमेश्वर तालुक्याचे नेतृत्व केले.

▪️सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १९ वर्षे वयोगट मुलांच्या खो-खो संघाने सदर स्पर्धेतील सर्व सामने जिंकून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले.

▪️जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत दणदणीत विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विभागस्तरीय स्पर्धेत कसबा हायस्कूलचा संघ रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.

▪️शाळेच्या परंपरेला साजेसे यश मिळवत खो-खो संघातील विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव पुनश्च: एकदा जिल्ह्यात मोठे केले आहे.

▪️खो-खो संघातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअली खलफे, खजिनदार श्री. शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री. एच.जी शेख, पर्यवेक्षक श्री. एस.ए. पटेल, मार्गदर्शक शिक्षक श्री. एन. एस. बाणदार, श्री. पी.जी. पडवळ, श्री. यु.टी. गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Breaking News