शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि सृजन इनोवेशन अँड ऍक्टिव्हिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मिस्त्री हायस्कूल ने विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक विकलांग गटात प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रशालेतील इयत्ता नववी मधील विद्यार्थिनी कुमारी मुनिबा बारगीर व कुमारी अरफीन वारगीर यांनी स्मार्ट ट्राफिक सिग्नल ही प्रतिकृती सादर केली होती. या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. त्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक इम्तियाज सिद्दीकी व निशात राजवाडकर तसेच सर्व विज्ञान शिक्षक व प्रयोग शाळा सहाय्यक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ज्या मध्ये प्रामुख्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री दिपक मेॅगाणे साहेब, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद भागवत, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील साहेब, संगमेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विजय परिट साहेब, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री सुदेश कदम सर,जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव श्री सुभाष सोकासणे सर आदि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच इम्तियाज सिद्दीकी यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक गटात सहभाग नोंदवून रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
प्रशालेच्या या यशाबद्दल सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री निसार लाला, सचिव श्री तन्वीर मिस्त्री, खजिनदार श्री जाहीर मिस्त्री,सहसचिव श्री शकील मजगावकर, संचालक कॅप्टन जावेद पटेल, साबीर मजगावकर, रफीक मुकादम, इकबाल मिस्त्री, मुख्याध्यापिका श्रीमती मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक श्री मुश्ताक आगा,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रशालेवर विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
