रत्नागिरीज्येष्ठ साहित्यिक ॲड. यशवंत कदम यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक ॲड. यशवंत कदम यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक ॲड. यशवंत कदम यांचे निधन.

चिपळूण : दसपटी विभागातील टेरव येथील ज्येष्ठ साहित्यिक, संवेदनशील लेखक-कवी आणि जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई – टेरव या संस्थेचे मा. अध्यक्ष, ॲड. यशवंत बाबुराव कदम (नमनेश्वर) यांचे वयाच्या ७८व्या वर्षी गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, न्याय, प्रशासकीय सेवा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी टेरव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ॲड. कदम यांनी आयकर विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय सेवा बजावली. कायदा व प्रशासन या क्षेत्रातील कार्यासोबतच मराठी साहित्य, संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात त्यांचा विशेष सहभाग होता. संवेदनशील लेखन, काव्यनिर्मिती आणि सामाजिक जाणिवेतून त्यांनी साहित्यविश्वात स्वतंत्र ठसा उमटविला.

‘फुलोरा’, ‘जीवनगाणे’, ‘अंतरंग’, ‘भक्तिरंग’, ‘बोलके झाड’, ‘महामानव…’, ‘जय दुर्गे आरती संग्रह’, ‘श्री कुलस्वामिनी आई भवानी देवस्थानचा समग्र इतिहास’, ‘आकाशाचे पंख’, ‘अंतरीचा दीप’, ‘गडगडीचा डोह’, ‘देव माणूस’, ‘वळणावळणाची वाट’ आदी विविध साहित्यकृती त्यांच्या लेखणीतून साकारल्या. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत वंदना प्रकाशनाचा जीवनगौरव पुरस्कार तसेच विविध साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

‘आरती संग्रहा’तील श्री कुलस्वामिनी भवानी मातेची आरती म्हणजे त्यांच्या पवित्र लेखणीतून उमटलेले अमूल्य अक्षरमोतीच होत. जोपर्यंत या आकाशात चंद्र-सूर्याचे अस्तित्व आहे, तोपर्यंत श्री क्षेत्र टेरवच्या मंदिरात ही मंगलमय आरती भक्तिभावाने निनादत राहील.

टेरवच्या मातीशी त्यांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते होते. आपल्या गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाशी ते अखेरपर्यंत जोडलेले राहिले. साहित्य, समाजसेवा आणि न्यायक्षेत्रातील त्यांचे योगदान तसेच गावाशी असलेली आत्मीयता यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व टेरवच्या इतिहासात आणि ग्रामस्थांच्या स्मरणात कायम राहणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, सगे-सोयरे, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Breaking News

4rabet Casino Depositing Guide: Payment Methods

When you join a new online casino, the first...

Exploring 1xbet Casino Game Selection

As online gambling continues to evolve, players increasingly look...