महाराष्ट्रडॉ.अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय.चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष पदी नियुक्ती--

डॉ.अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय.चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष पदी नियुक्ती–

मुंबई (शांताराम गुडेकर) – पुणे येथील डॉ.अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए. आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हा सन्मान जपानची राजधानी टोकियो येथे एका विशेष समारंभामध्ये जपानचे पंतप्रधान यांचे सल्लागार तथा माझी मंत्री कझुयुकि हमाडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यांची ही नियुक्ती जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या ए.आय. समिटमध्ये भाग घेतला होता.यामध्ये त्यांनी प्रामुख्याने फ्रान्स आणि भारताच्या ए. आय. आणि डिजिटल इनोवेशन सहयोगा बाबत नुकतेच निरनिराळ्या बाबींच्या सहयोगावर ठराव केले गेले होते.या ठरावाच्या करारावर मोदींनी मान्यतेच्या करारावर सह्या केल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी या फ्रान्सच्या भेटीत ए..आय, सायबर क्राईम सुरक्षा, डिजिटल गव्हर्नन्स याबद्दल भारताला सशक्त बनवण्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
विविध क्षेत्रात डॉ.अविनाश सकुंडे यांचे नेतृत्व कौशल्य तसेच दूरदृष्टी व इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स फेडरेशनच्या माध्यमातून अनेक नव उद्योजकांना केलेल्या मदतीचे तसेच मार्गदर्शनाचे आंतरराष्ट्रीय आढावा घेत ही ए.आय.तसेच ई.व्हि.चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेचा प्रचार आणि प्रसार भारताकरता एका नवीन उंची वरती नेऊन ठेवतील यात शंका नाही.नवीन अध्यक्षांना जपान पंतप्रधानांचे सल्लागार तथा माजी मंत्री कझुयुकि हमाडा यांनी शुभेच्छा दिल्या. भविष्यकाळात संस्थेचे ध्येयधोरण जास्तीत जास्त नवीन उद्योजकांना यात सहभागी करून संस्थेचे नाव उज्वल्य करावे ही आशा व्यक्त केली. संबंधित नियुक्ती करताना जपानमध्ये विविध उद्योजकांनी डॉ.संकुडे यांना शुभेच्छा दिल्या.

Breaking News