रत्नागिरीडॉ.संजयकुमार कलकुटगी यांची मनोविकृती चिकित्सक पदी पदोन्नती

डॉ.संजयकुमार कलकुटगी यांची मनोविकृती चिकित्सक पदी पदोन्नती

रत्नागिरी, जिमाका) : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार कलकुटगी यांची पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे मनोविकृती चिकित्सक पदावर पदोन्नती झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी याबाबत आज शासन आदेश काढला आहे. डॉ. कलकुटगी 2002 पासून रत्नागिरीत कार्यरत आहेत. 2017 पासून प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत आहेत. उपसचिव दीपक केंद्रे यांच्या स्वाक्षरीने विशेषज्ञ संवर्गातील मनोविकृती चिकित्सक पदावर ही पदोन्नती झाली आहे.

Breaking News

रत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ ऑगस्ट रोजी खेळाडू निवड चाचणी

रत्नागिरीत 'खेलो इंडिया' बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ ऑगस्ट रोजी...