दाभोळे जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अर्थ सभापती व माजी जिल्हा प्रमुख विलास चाळके हे 5 420 मतांनी विजयी झाले आहेत.
दाभोळे जिल्हा परिषद गट हा विलास चाळके यांचा बालेकिल्ला असल्याने यांना या गटात एकूण 8038 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात वंचित कडून उभे असलेल्या वीरश्री बेटकर यांना 2618 मते मिळाली. वीरश्री बेटकर यांचा 5420 मतांनी विलास चाळके यांनी दारुण पराभव केला आहे.
विलास चाळके हे निवडून येणार हे जवळपास जाहीर असताना त्यांना जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेग मतदान पडण्यासाठी नेते व कार्यकर्ते जीवाचे रान करीत होते. त्याप्रमाणे मतांचा आकडा पहिल्या फेरीपासूनच विलास चाळके यांना लिडच दाखवत होता. विलास चाळके यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला असल्याने त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत
दाभोळे जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे नेते व माजी जिल्हा प्रमुख विलास चाळके प्रचंड मतांनी विजयी
