Uncategorizedधनंजय मुंडे यांनी काम न करता तब्बल 73 कोटींची बिले उचलली; सुरेश...

धनंजय मुंडे यांनी काम न करता तब्बल 73 कोटींची बिले उचलली; सुरेश धसांचा पुन्हा हल्लाबोल

धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना तब्बल 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळी आणि अंबाजोगाई मतदार संघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले, असा दावा सुरेश धस यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये जाण्यापूर्वीच,धसांचा गौफ्यस्फोट
आज बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बोगस बिले उचलल्याचा आरोप केला. तसेच आपल्याकडे असलेली कागदपत्रे अजित पवारांना देणार असून याबाबत तक्रार करणार असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.

किती तारखेला कशी उचलली गेली बीले?

सुरेश धस म्हणाले, मीडियाची मेमरी स्ट्रॉंग असेल तर कोणीतरी कोकणे नावाचे कार्यकारी अभियंता होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पिस्तूल मागितले होते. याची चौकशी आता मुख्यमंत्री करत आहेत. सन 2021-22 अंतर्गत यावेळेस धनंजय मुंडे पालकमंत्री होते. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयांचे बिले उचलली.
दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 2 कोटी 31 लाख
दिनांक 18 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग बीड 10 कोटी 98 लाख
दिनांक 25 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग अंबाजोगाई 6 कोटी 59 लाख
दिनांक 26 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद विभाग बीड क्रमांक 2 16 कोटी 48 लाख

  • दिनांक 31मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता विभाग जिल्हा परिषद बीड 1 कोटी 34 लाख,

असे एकूण 37 कोटी 70 लाख रुपये या कामांची बोगस बिले. संजय मुंडे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले. ते डेप्युटी इंजिनिअर होते. त्यावेळी त्यांना चार्ज दिला. 25 जून 2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता विभागाचा प्रभारी कार्यभार दिला. त्यांनीही बिले उचलून दिली, असाही आरोप सुरेश धस यांनी केला.

सुरेश धस म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते. दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी, दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी एक कामाचे 1 कोटी 20 लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचेही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आले आहेत.

Breaking News