रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी-जोगेश्वरी यांच्या आगामी शिमगोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना आणि पालखी सोहळ्याला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. श्री देव कालभैरव मार्ग (खालची आळी) येथील रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण कामाची नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व उत्सवापूर्वी सर्व पालखी मार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवसातच कोकणातील लोकप्रिय शिमगोउत्सव सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी शहरातील विविध मार्गाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिली
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
