नाताळ म्हणजेच ख्रिसमस निमित्त आपल्या रत्नागिरी मधील मिलाग्रीस चर्च येथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी तिथे उपस्थित राहून आशीर्वाद घेतले व उपस्थित सर्व ख्रिश्चन बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा दिल्या !
नाताळ हा केवळ ख्रिस्ती लोकांचा सण नसून, तो आता प्रेम, क्षमा, दानशूरता आणि परस्परांबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण बनला आहे. येशू ख्रिस्ताने दिलेली ‘शत्रूंवरही प्रेम करा’ आणि ‘गरिबांना मदत करा’ या शिकवणीतून या सणाला एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी फादर सेबी परेरा , स्थानिक नगरसेविका सायली पाटील, चेतना गाडेकर, युवराज शेट्ये आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी चर्च च्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला