रत्नागिरीपालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा उत्साहात...

पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा उत्साहात शुभारंभ

पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘Rotary Rain Run’चा उत्साहात शुभारंभ–

Say No to Drugs ’चा संदेश देत शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग–

👉रत्नागिरी: रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ‘Rotary Rain Run – Say No to Drugs या रेन रनचे आयोजन करण्यात आले होते,अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने’ या सामाजिक उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ झाला. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदयजी सामंत,रत्नागिरी पोलिस अधीक्षक श्री.नितिन बगाटे ,रोटरी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री.प्रताप पुराणिक ,डी.व्हाय.एस.पी अभिजीत थोरात, रोटरी कर्नाटक गोवाचे डिस्ट्रक्ट गव्हर्नर इलेक्ट श्री.अशोक नाईक,रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड.मनिष नलावडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॉटरी रेन रन ला सुरुवात करण्यात आली.

रत्नागिरी मधील ६८० धावपटू आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पावसात धावताना धावपटूंनी ‘Say No to Drugs’ चा प्रभावी संदेश देत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी जनजागृती केली.

यावेळी बोलताना पालकमंत्री मा. उदयजी सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यावर भर दिला. रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचा पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराशी संबंधित व्यक्तींना रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार करण्यासह कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने ‘Say No to Drugs’ हा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी पोलिस अधीक्षक मा. नितीन बगाटे यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देत युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला रोटरी पीडीजी प्रताप पुराणिक, रोटरी कर्नाटक गोवाचे डिस्ट्रक्ट गव्हर्नर इलेक्ट श्री.अशोक नाईक, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे रोटे. प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचे रोटे. राजेश घटवाल, डॉ. संदीप करे तसेच असिस्टंट गव्हर्नर बिपीन गांधी यांची उपस्थिती होती.

Say No to Drugs’ हा संदेश केंद्रस्थानी ठेवून आयोजित या Rain Run मध्ये सहभागी धावपटूंनी पावसात धावत निरोगी जीवनशैली, व्यसनमुक्त युवा आणि सुरक्षित समाजाचा संदेश दिला. रोटरीचा संकल्पनेतून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार तसेच युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य प्रायोजक Physio-Bot, श्री. परेशजी साळवी, रत्नागिरी खबरदार टीम, रत्नशिल्प ज्वेल्स, श्री. श्रीकांतजी भुर्के, पोदार इंटरनॅशनल स्कूल ऑफ रत्नागिरी आणि Aim Fitness Team यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, आयोजन समिती, स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, Physio-Bot टीम, भगवान सांबरे हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक, सहकारी संस्था, प्रायोजक आणि सर्व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे म्हणाले,
“आजची धाव ही केवळ आरोग्यासाठीची धाव नव्हती; ती व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल होते. सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूने ‘Say No to Drugs’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.”

कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सर्व धावपटू, स्वयंसेवक, सहकारी, प्रायोजक आणि रत्नागिरीकर नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Breaking News