रत्नागिरीपावसाळी अधिवेशन समाप्त

पावसाळी अधिवेशन समाप्त

पावसाळी अधिवेशन समाप्त

१४ बैठकींमध्ये १२७ तास ५४ मिनिटे कामकाज-
.
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. २२ जून ते १० जुलै या कालावधीत झालेल्या अधिवेशनात एकूण १४ बैठका झाल्या असून १२७ तास ५४ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज पार पडले. दररोज सरासरी ९ तास ८ मिनिटे कामकाज झाले.

अधिवेशनातील ठळक आकडेवारी :

  • एकूण बैठका : १४
  • प्रत्यक्ष कामकाज : १२७ तास ५४ मिनिटे
  • अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ : ५ मिनिटे
  • मंत्री अनुपस्थितीमुळे वाया गेलेला वेळ : २५ मिनिटे
  • दररोज सरासरी कामकाज : ९ तास ८ मिनिटे
  • नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा परिचय : २
  • शोक प्रस्ताव : ११

प्रश्नोत्तरांचा आढावा :

  • तारांकित प्रश्न प्राप्त : १०९५
  • स्वीकृत : ४१०
  • उत्तरित : ५८
  • अतारांकित प्रश्नांच्या सूचना : २१३७
  • लेखी उत्तरे : ५००
  • ३७ ते ४६ क्रमांकाच्या अतारांकित याद्या पटलावर ठेवण्यात आल्या.

इतर कामकाज :

  • अल्पसूचना प्रश्न : ७ (सर्व अस्वीकृत)
  • अल्पकालीन चर्चा : ६, त्यापैकी ५ मान्य, ३ चर्चा झाल्या
  • लक्षवेधी सूचना : २११८
  • स्वीकृत लक्षवेधी : २१२
  • चर्चा झालेल्या लक्षवेधी : ६२
  • नियम ९७ अंतर्गत सूचना : १३०, एकही मान्य नाही.

Breaking News