पुणे शहरातील कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक शिवसेना उपनेते, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली-.
👉या बैठकीत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पुणे शहरप्रमुखांसह सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधून संघटनात्मक कामांचा आढावा घेत पक्षाच्या कार्याविषयी सकारात्मक चर्चा केली. यावेळी संवाद साधतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पक्षाच्या कार्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजूटीने कार्य करण्यासोबत जनसंपर्क अधिक प्रभावी करणे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राध्यान देण्याविषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीला मा.आमदार श्री.रविंद्र धंगेकर, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री.प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह कसबा आणि पर्वती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
