संपूर्ण घटनाक्रम—.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर नराधमानं बलात्कार केला. पहाटे साडेपाच च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. मी आयुक्तांशी बोललो आहे. संबंधित गुन्हेगार सापडला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. या शहरात असे कुठले प्रकार चालू दिले जाणार नाहीत. तशा सूचना दिलेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
👉नेमकं काय घडलं?
२६ वर्षांची तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती.
पहाटेच्या सुमारास पीडित तरुणी स्वारगेट बसस्थानकात पोहोचली.
फलटणकडे जाणाऱ्या बसची ती वाट बघत स्थानकात उभी होती.
त्याचवेळी दत्तात्रेय गाडे हा आरोपी तिच्याकडे आला.
त्याने पीडितेशी ओळख वाढवली.
तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याकडून माहिती काढून घेतली.
एसटी बस दुसरीकडे थांबल्याचे या आरोपीने तिला सांगितले.
अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं.
तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तो पळून गेला.
आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.. दरम्यान पुणे पोलिस ॲक्शन मोड मध्ये आले असून त्यांनी सर्वत्र विशेष पथके आरोपींला पकडण्यासाठी पाठवली आहेत—