प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती शाळेत रोबोटिक ए आय लॅबचे उद्घाटन’ – डिजिटल शिक्षणाची नवी भरारी
स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून
प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने ए आय रोबोटिक लॅब सुरू करण्यात आली. या रोबोटिक लॅबचे उद्घाटन सहयाद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार मा.शेखरजी निकम सर, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम , स्काय रोबोटिकचे ऑपरेटर सहस्रबुद्धे सर,बी . कृष्णमूर्ती सर, डॉ. राकेश चाळके,श्री. वरेकर सर, रुपेश इंगावले , कॉन्ट्रॅक्टर खातू सर, कांबळे सर,दिनेश शिंदे,सुतार सर, प्रकाश पालकर , अर्चना ठसाळे, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सदस्या अँड. सौ. स्मिता कदम,शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सर, समिक्षा पिटले मॅडम, ममता ठसाळे मॅडम विद्यार्थी ,पालक, शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत विशेष तयार केलेल्या रोबोट मार्फत फित कापून व श्रीफळ वाढवून उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम साहेब व स्व. अनुराधाताई निकम मॅडम व विद्येची देवता माता सरस्वती यांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
रोबोटिक लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, विज्ञान, संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोपक्रम यांची ओळख होणार असून, प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळणार आहे असे शाळेचे मुख्याध्यापक श्री अरविंद सकपाळ सर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.या तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यांच्यात समस्या सोडविण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. विद्यमान आमदार मा . शेखर सरांनी देखील या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व या शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळतील असा आशावाद व्यक्त केला .रोबोटिक लॅबची पाहणी करताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि कुतूहल दिसून आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
प्राथमिक शाळा धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मिडियम स्कूल खेर्डी चिंचघरी सती येथे सुरू झालेली रोबोटिक लॅब विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल तंत्रज्ञानाधारित भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सर,इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका समिक्षा पिटले मॅडम, शिशूविहारच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे मॅडम ,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली .
