रत्नागिरीबारावीचा निकाल उद्या शनिवारी ! विद्यार्थ्यांची व पालकांची उत्सुकता शिगेला

बारावीचा निकाल उद्या शनिवारी ! विद्यार्थ्यांची व पालकांची उत्सुकता शिगेला

बारावीचा निकाल उद्या शनिवारी ! विद्यार्थ्यांची व पालकांची उत्सुकता शिगेला-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून अधिकृत घोषणा; निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन;

👉महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल उद्या शनिवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी–मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या परीक्षेला राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे निकालाच्या घोषणेकडे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचेही लक्ष लागले आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत यंदाच्या निकालाची सविस्तर आकडेवारी, एकूण उत्तीर्ण टक्केवारी, विभागनिहाय कामगिरी, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. विशेषतः मागील वर्षांच्या तुलनेत निकालात काय बदल झाले, कोणत्या विभागाने सरस कामगिरी केली आणि कोणत्या शाखेत उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक राहिले, याबाबतची माहितीही यावेळी समोर येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक राहणार आहे. निकाल पाहताना कोणतीही घाई न करता सर्व तपशील—नाव, विषयनिहाय गुण, एकूण टक्केवारी—काळजीपूर्वक तपासणे गरजेचे आहे. निकालाच्या वेळी वेबसाईटवर ताण येण्याची शक्यता असल्याने काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन ही मंडळाकडून करण्यात आले आहे.

Breaking News

Що казино вважають бонусним зловживанням

Що казино вважають бонусним зловживаннямНа підлозі казино це видно...

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην Πράξη

Da Vinci Diamonds Dual vs Yum Yum Powerways Στην...