रत्नागिरी'बालजगत'मध्ये दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास

‘बालजगत’मध्ये दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास

‘बालजगत’मध्ये दहावीनंतर वेगळी वाट निवडणाऱ्या रेवण गवसचा प्रेरणादायी प्रवास
रत्नागिरी : दहावीनंतर पारंपरिक शिक्षणाची वाट न निवडता स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील रेवण गवस याचा प्रेरणादायी प्रवास आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बालजगत’ या कार्यक्रमातून उलगडणार आहे. 2 ऑगस्ट रोजी ही मुलाखत सकाळी 9.30 वाजता प्रसारित होणार आहे.
बालपणापासूनच संशोधक वृत्ती असलेल्या रेवणला सतत नवनवीन प्रयोग करण्याची आवड होती. त्याच्या या जिज्ञासू स्वभावाला वडील जयवंत गवस आणि आई यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. लहान वयातच त्याने लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्स या क्षेत्राचा अभ्यास सुरू केला. इंटरनेटचा सकारात्मक उपयोग करून देश-विदेशातील संशोधकांचे मार्गदर्शन, संशोधन आणि तांत्रिक माहिती आत्मसात करत त्याने स्वतःचे ज्ञान सातत्याने वाढवले.
दहावीनंतर नेहमीच्या शिक्षणपद्धतीऐवजी इलेक्ट्रिक व्हेईकल्स क्षेत्रातील शिक्षणाला प्राधान्य देत त्याने स्वतःची स्वतंत्र वाट निवडली. भविष्यात आपल्या गावातच इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबरोबरच लिथियम बॅटरी उद्योग उभारण्याचे त्याचे स्वप्न असून त्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.
‘मळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःचा राजमार्ग शोधण्याची धडपड’ करणाऱ्या रेवण गवस आणि त्यांचे वडील जयवंत गवस यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘बालजगत’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम मध्यम लहरी 1143 kHz, एफ.एम. 101.5 MHz तसेच News On AIR मोबाईल ॲपवर थेट ऐकता येईल. याशिवाय प्रसारण झाल्यानंतर AIR Ratnagiri च्या अधिकृत YouTube चॅनेलवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...