रत्नागिरीभरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा;

स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या!

दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याबाबत उच्चस्तरीय समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाची अधिकृत पोहोचही प्राप्त केली आहे.

विद्यार्थी आणि तरुणांच्या भवितव्याशी संबंधित खालील महत्त्वाचे मुद्दे यावेळी ठामपणे मांडण्यात आले—

🔹 भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झाल्या पाहिजेत.
परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणारा कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

🔹 भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक आगाऊ जाहीर झाले पाहिजे.
अर्ज प्रक्रिया, प्रवेशपत्र, परीक्षा तारीख व वेळ, परीक्षा केंद्र, उत्तरतालिका, हरकती, निकाल, गुणवत्ता यादी आणि नियुक्तीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक उमेदवारांना आधीच स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावे.

🔹 प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शक्यतो त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळाले पाहिजे.
रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे किंवा इतर दूरच्या शहरांमध्ये परीक्षा देण्यासाठी जाण्याची वेळ येऊ नये. यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताण कमी होईल.

🔹 स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार स्थानिक रोजगाराची अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे.
रत्नागिरी व कोकणातील स्थानिक पात्र उमेदवारांना स्थानिक आस्थापनांमध्ये ८०% पर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घटनात्मक व कायदेशीर चौकटीत आवश्यक धोरण/तरतूद करण्याबाबत शासन दरबारी प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी निवेदनातून लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.

आमचा स्पष्ट आग्रह —

परीक्षा पारदर्शक असावी,
प्रक्रिया वेळेत असावी,
विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी,
आणि गुणवत्तेच्या आधारावर स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या भूमीत रोजगाराची संधी मिळावी!

विद्यार्थी आणि तरुणांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रत्नागिरी जिल्हा यासाठी सातत्याने आवाज उठवत राहील.

श्री. मनिष विलास पाथरे
जिल्हा संघटक – रत्नागिरी जिल्हा
जिल्हाध्यक्ष – उत्तर रत्नागिरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Breaking News

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...

‘सेवा संकल्प अभियान’: सहकार विभागाकडून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा सुपूर्द

‘सेवा संकल्प अभियान’: सहकार विभागाकडून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा...