रत्नागिरीभांबेड जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

भांबेड जिल्हा परिषद व पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

आमदार किरण सामंत व माजी आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती-
भांबेड जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या बैठकीत निवडणूक रणनीती, संघटनात्मक मजबुती, बूथनिहाय तयारी तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर नेत्यांनी भर दिला.
आमदार किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या मार्गदर्शनातून अनुभवाच्या जोरावर योग्य रणनीती आखण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
या आढावा बैठकीमुळे भांबेड गणातील निवडणुकीसाठी तयारीला वेग आला असून, राजकीय हालचालींना चांगलाच रंग चढल्याचे चित्र आहे.

Breaking News