रत्नागिरीभाजपाचे महामंत्री तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार निरंजन डावखरे आणि आमदार योगेश...

भाजपाचे महामंत्री तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार निरंजन डावखरे आणि आमदार योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण रत्नागिरी येथील हॉटेल अभिरुची सभागृहात आयोजित दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली

भाजपाचे महामंत्री तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार निरंजन डावखरे आणि आमदार योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण रत्नागिरी येथील हॉटेल अभिरुची सभागृहात आयोजित दक्षिण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक पार पडली..

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाच्या कामगिरीचा आढावा मांडला. तसेच संपूर्ण कोकणात गावोगावी आणि घरोघरी भाजपा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी बैठकीचे औचित्य साधून सर्व मंडलांच्या वतीने भाजप स्थापना दिवस, मन की बात संवाद कार्यक्रम, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, एस.आय. आर. अभियान यांसह विविध उपक्रम व कार्यक्रमांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी आणि विविध सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात भाजपाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संवाद कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक माध्यमांवरील सक्रियता वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा चेहरा आहे, त्यामुळे त्याची वर्तणूक, अभ्यास आणि समाजाशी असलेले नाते हेच पक्षाची प्रतिमा घडवत असते. स्थानिक पातळीवरील समस्या सोडवताना जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देणे, यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे. तसेच या आढावा बैठकीतून केवळ आपल्या कामाचा हिशेब न मांडता, पुढील कृती आराखडा ठोसपणे निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार प्रत्येकाने मनाशी बाळगला, तरच संघटनाची ताकद अधिक सक्षम होईल, असाही विश्वास व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, देवरुखच्या नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, रत्नागिरी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अजित निकम, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, चिपळूण शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे
यांच्यासह दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व मंडल अध्यक्ष, मंडलाचे सरचिटणीस आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News