रत्नागिरीभाट्ये रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक...

भाट्ये रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

भाट्ये रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट–

👉चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत भाट्ये, रत्नागिरी येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला शैक्षणिक भेट दिली. या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले आणि कृषीशास्त्र विभागाचे प्रा. विघ्नेश सपकाळ हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. नारळ व रोपण पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची आणि प्रत्यक्ष संशोधन कार्याची सविस्तर माहिती मिळवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नारळाच्या विविध संकरित जाती, रोपवाटिका व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापनासोबतच नारळ बागेत आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या विविध रोपण व मसाले पिकांचे (जसे की जायफळ, दालचिनी, काळीमिरी, लवंग व ऑलस्पाईस) प्रत्यक्ष प्रक्षेत्र निरीक्षण केले.विशेष म्हणजे, संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या बहुस्तरीय ‘लखीबाग’ (लाखीबाग) मॉडेल ची विद्यार्थ्यांनी बारकाईने पाहणी केली. नारळाच्या बागेत विविध मसाले पिके, केळी व अननस यांच्या आंतरपीक लागवडीतून प्रति एकर उत्पन्न कसे वाढवता येते, याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. तसेच, परागीभवन व मध उत्पादनासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या डंखरहित मधमाशी पालनाबाबत (Stingless Bee Rearing / मेलीपोनिकल्चर) विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
प्रक्षेत्र पाहणीदरम्यान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना नारळ व मसाले पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, मित्रकीटकांचे संवर्धन, तसेच डंखरहित मधमाशी पालनाचे महत्त्व आणि तंत्रज्ञान याविषयी प्रक्षेत्रावर थेट प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. या शैक्षणिक उपक्रमासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण म्हाळशे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
ही शैक्षणिक भेट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

Breaking News

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...