भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत कै.मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर चे घवघवीत यश… कु. ओवी भोसले राज्यात दुसरी तर तीन विद्यार्थिनी केंद्रात

0
3

भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत कै.मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर चे घवघवीत यश… कु. ओवी भोसले राज्यात दुसरी तर तीन विद्यार्थिनी केंद्रात

मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये कैलासवासी मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर ची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी ओवी दिनेश भोसले हिने २००पैकी १८४ गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे व संस्थेचे नाव उज्वल केले आहे. तसेच याच वर्गातील कुमारी परी सुरज घाणेकर ही केंद्रात प्रथम, कुमारी खुशी रंजीत मडके केंद्रात द्वितीय तर कुमारी नित्या पुनीत कांबळे हिने केंद्रात तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आज मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष मा. डॉक्टर चंद्रशेखर केळकर तसेच शाळेच्या विभाग प्रमुख मा. सौ. संजना तारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राज्यात द्वितीय क्रमांक पटकावलेली ओवी व तिचे पालक यांचा सत्कार करण्यात आला. कुमारी ओवी भोसले हिला परीक्षा केंद्राकडून दोन मेडल, सर्टिफिकेट, रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच परी घाणेकर, खुशी मडके, नित्या कांबळे यांनाही मेडल, सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह देण्यात आले. उपस्थित पालकांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
तसेच या शाळेतील ज्येष्ठ सेविका सौ. रेश्मा भिकाजी मोहिते यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा २०२६-२७ साठीचा कै. मालतीबाई जोशी आदर्श सेविका पुरस्कार प्राप्त झाला . त्याबद्दल शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
शाळेचे शालेय समिती अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर केळकर व विभाग प्रमुख सौ.संजना तारी यांनी आपल्या मनोगतातून सेविका रेश्मा मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे व त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास पांचाळ व सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here