रत्नागिरीमंडणगड ग्रामीण रुग्णालयात ‘लड्डू गोपाल’ योजनेअंतर्गत विशेष बाल आरोग्य शिबिर संपन्न; ४१...

मंडणगड ग्रामीण रुग्णालयात ‘लड्डू गोपाल’ योजनेअंतर्गत विशेष बाल आरोग्य शिबिर संपन्न; ४१ बालकांची तपासणी

मंडणगड ग्रामीण रुग्णालयात ‘लड्डू गोपाल’ योजनेअंतर्गत विशेष बाल आरोग्य शिबिर संपन्न; ४१ बालकांची तपासणी
रत्नागिरी, (जिमाका) : तालुक्यातील कुपोषणमुक्तीसाठी ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे ‘लड्डू गोपाल’ योजनेअंतर्गत ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) आणि ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) बालकांसाठी विशेष संदर्भ सेवा आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
हे शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालय मंडणगडचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) मंडणगड कार्यालयाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) ज्ञानेश्वरी दातीर यांची विशेष उपस्थिती लाभली.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी
संदर्भ सेवेसाठी बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रांजल तौर यांनी उपस्थित बालकांची सखोल वैद्यकीय तपासणी केली. शिबिरादरम्यान प्रत्येक बालकाचे वजन, उंची, डोक्याचा घेर तसेच दंडघेर मोजून शारीरिक वाढीचे अचूक मूल्यांकन करण्यात आले. गरजेनुसार बालकांना तत्काळ औषधोपचार देण्यात आले, तसेच बालकांच्या पोषणासाठी विशेष पौष्टिक लाडूंचे वाटप करण्यात आले.
शिबिराचा तपशील:

  • एकूण उपस्थित लाभार्थी बालके: ४१
  • ‘सॅम’ (तीव्र कुपोषित) बालके: ७
  • ‘मॅम’ (मध्यम कुपोषित) बालके: २३
  • सर्वसाधारण (नॉर्मल) बालके: ११
  • औषधोपचार मिळालेली बालके: ३७
  • पौष्टिक लाडू वाटप लाभार्थी: ३९
    कुपोषण निर्मूलनासाठी शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. या उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय, बाल विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले.

Breaking News

भरती परीक्षा पारदर्शक करा;

भरती परीक्षा पारदर्शक करा; स्थानिक भूमिपुत्रांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी द्या! दि....

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन

शिक्षण विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेचे मुंबईत धरणे आंदोलन---- न्याय न...