रत्नागिरीमत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे 'शाश्वत शेती दिना'निमित्त 'ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन'...

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे ‘शाश्वत शेती दिना’निमित्त ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन’ प्रशिक्षण संपन्न

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे ‘शाश्वत शेती दिना’निमित्त ‘ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन’ प्रशिक्षण संपन्न
रत्नागिरी: हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त ७ ऑगस्ट हा दिवस ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्याने दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन (शिरगाव, रत्नागिरी), सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र (झाडगाव, रत्नागिरी), आसमंत फाउंडेशन (पुणे) आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने “ब्लॅक सोल्जर फ्लाय संवर्धन” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, डॉ. मनोज घुघुसकर, आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रीमती सुवर्णा चौधरी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या फोटोला हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि कोकण कृषि विद्यापीठाच्या गीताने उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमास शिरगाव पंचक्रोशीतील महिला, ‘जलजीविका’चे प्रकल्प व्यवस्थापक, इनरव्हील क्लबच्या सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी स्पष्ट केले की, “शाश्वत शेतीकरिता सातत्याने संशोधन होणे आवश्यक असून त्यासोबतच पर्यावरणाचा विकास साधणे गरजेचे आहे. जैविक कचऱ्याचे वेळीच योग्य व्यवस्थापन केले नाही तर रोगराई पसरू शकते. यावर मात करण्यासाठी डॉ. मनोज घुगुसकर यांनी ‘काळी सैनिकी माशी’चे (ब्लॅक सोल्जर फ्लाय) केलेले संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे जैविक कचऱ्याचे विघटन करून त्यापासून शाश्वत मत्स्य शेती व कुक्कुटपालनासाठी उत्तम खाद्य उपलब्ध होते, तर तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर शेतीसाठी उत्तम प्रकारे करता येतो.”
‘ब्लॅक सोल्जर फ्लाय’ (बी.एस.एफ.) म्हणजेच काळी सैनिकी माशी ही एक स्थानिक व निसर्गाला पूरक असणारी माशी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मनोज घुगुसकर यांनी या माशीच्या संवर्धनाचे तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये दैनंदिन ओला कचरा, सेंद्रिय पदार्थ आणि शेतातील जैविक कचऱ्याचे या माशीच्या साहाय्याने अत्यंत जलद गतीने विघटन केले जाते. ही पद्धत गांडूळ खतापेक्षा अधिक वेगाने खत तयार करते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी जगभरात याचा जैविक पर्याय म्हणून वापर केला जात आहे. या माशीच्या अळ्यांचा वापर पशु आणि पक्षांसाठी उच्च दर्जाचे खाद्य म्हणूनही केला जातो. प्रशिक्षणामध्ये डॉ. मनोज घुगुसकर यांनी उपस्थितांना हे तंत्रज्ञान अत्यंत साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितले. शंका समाधान घेण्यात आले . इनरव्हील च्या अध्यक्षा डॉ सुवर्णा चौधरी यांनी आभार मानले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या प्राध्यापक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. तोरणे, मा. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, शिक्षण संचालक डॉ सतीश नारखेडे, कृषि तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ वरवडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...