रत्नागिरीमत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर

संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिलाच दौरा…

रत्नागिरी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या शनिवारी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. भाजपची त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती व जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिला रत्नागिरी दौरा असून ते भाजपा संघटनात्मक बैठक घेणार आहेत.

ना. नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायीकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणा बाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पक्ष बळकटीसाठी भाजपने जिथे भाजपचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये ना. नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी असून त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...