महाराष्ट्रमहाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड एसएमई समिट" मध्ये ना. उदय सामंत ह्यांचा सहभाग--

महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड एसएमई समिट” मध्ये ना. उदय सामंत ह्यांचा सहभाग–

बीकेसी, मुंबई येथे महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित “महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड एसएमई समिट” हा कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समिटचे उद्घाटन ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रसंगी MIDA आणि SME चेंबर ऑफ इंडिया चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांच्यासह अनेक उद्योगपती, उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. उदय सामंत ह्यांनी उद्योग आणि लघु-मध्यम उद्योगांच्या विकासासाठी अशी व्यासपीठे महत्त्वपूर्ण ठरतात असे म्हटले. ना. उदय सामंत ह्यांनी या समिटमध्ये सहभागी होत विविध उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला.

Breaking News