महाराष्ट्रमहाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच भेट. नरेद्रं मोदींनी रवींद्र चव्हाण यांना दिल्या शुभेच्छा–

महाराष्ट्रातील संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना केला सादर

पंतप्रधान मोदींकडून पुढील कार्यासाठी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र भाजपची संघटनात्मक घडामोडी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन व पक्षवाढीची दिशा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.

या भेटीत रवींद्र चव्हाण यांनी ‘कार्य विस्तार अभियान’ संदर्भातील विशेष पुस्तिका पंतप्रधानांना सादर केली. या पुस्तकात महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनकार्य, सदस्य नोंदणी मोहिम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला-युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर आढावा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री.रविद्रं चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.. रविंद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्या पासून सतत संघटना मजबूत करण्यासाठी सतत कार्यरत आहेत..

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

राज्याला पुढे नेणे, कोकणचा विकास करणे हे आमचे ध्येय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी,  (जिमाका) : राज्यातील एकही माणूस उपाशी झोपता कामा...