रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना....

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी तालुका रोहिदास समाज सेवा संघ, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित संत रोहिदास जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन केले.

संत रोहिदास महाराजांचे विचार हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक क्रांतीचे होते. समता, बंधुता, मानवता आणि परस्पर आदर यांचा संदेश देत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आजही आपल्याला एकत्र राहण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा देतात असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, नगरसेवक विजय खेडेकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी नगरसेविका प्रीती सुर्वे आदी उपस्थित होते.

Breaking News