महाराष्ट्रमहाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे...

महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा : बोधचिन्ह अनावरण समारंभ यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले की
साताऱ्यातील हे संमेलन आदर्शवत आणि नाविन्यपूर्ण ठरेल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. शासनामार्फत या संमेलनासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही असा शब्द दिला.

यावेळी मराठी भाषेला सातासमुद्रापार नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहितीही दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शासन म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. साहित्य, संस्कृती आणि परंपरा यांचा ठेवा जगासमोर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.

Breaking News

साखर गावच्या श्री नवलादेवी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ

राजापूर तालुक्यातील श्री नवलादेवी लक्ष्मीकेशव देवालय ट्रस्ट, साखर तर्फे...

रत्नागिरी शहरातील स्वच्छतादूतांना भाजपा माजी नगरसेवकांकडून साहित्य वाटप–

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता...